माझी आई निबंध मराठी | My Mother Essay In Marathi
Majhi Aai Nibandh In Marathi: आई ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची आणि प्रिय व्यक्ती असते. तिचे प्रेम आणि काळजी आपल्यासाठी आधारस्तंभासारखी असते. आई आपल्या मुलांसाठी कोणतीही अडचण येऊ देत नाही आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देते. तिच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. या लेखामध्ये मी माझी आई वर १०० शब्दांमध्ये निबंध लेखन केलेले आहे
My Mother Essay In Marathi
आई, हा शब्दच पूर्ण प्रेम, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. माझी आई ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि लाडकी व्यक्ती आहे. तिने मला जन्म तर दिलाच, पण प्रत्येक पावलावर मार्गदर्शन केले आणि मला जीवनाची खरी शिकवण दिली. आईचे प्रेम आणि आपुलकी शब्दात वर्णन करणे अवघड आहे, कारण तिचे प्रेम अनमोल आणि अनंत आहे.
माझी आई अतिशय दयाळू आणि संवेदनशील स्वभावाची आहे. इतरांना मदत करण्यास ते सदैव तत्पर असते. आपण इतरांना मदत केली तर समाजात चांगले बदल घडवून आणता येतील, असा तिचा विश्वास आहे. आई रोज सकाळी लवकर उठून संपूर्ण घर सांभाळते. तिच्या दिवसाची सुरुवात कुटुंबासाठी जेवण बनवून आणि घराची साफसफाई करून होते. एवढ्या सगळ्या गोष्टींनंतरही ती कधीच थकलेली दिसत नाही, तर नेहमी हसते.
आयुष्यात कधीही हार न मानण्याची शिकवण माझ्या आईने मला दिली. तिला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पण आपले दु:ख कधीच कोणासमोर मांडले नाही. तिची शिकवण माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनला आहे. आईच्या शिकवणुकीने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि कठीण परिस्थितीत मला योग्य मार्ग दाखवला आहे.
आई केवळ घरकामात पारंगत नाही, तर ती उत्तम शिक्षिका देखील आहे. ती माझ्यासोबत बसून माझा अभ्यास घेते आणि जेव्हा जेव्हा मला कोणत्याही विषयात अडचण येते तेव्हा ती मला समजावून सांगण्यासाठी वेळ काढते. तिची ही सवय माझ्या अभ्यासासाठी खूप उपयुक्त ठरते. शिक्षण माणसाला योग्य मार्गावर घेऊन जाते आणि समाजात सन्मान मिळवून देते, असे ती नेहमी सांगते.
माझी आई माझा प्रेरणास्त्रोत आहे. अत्यंत निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडणारी ती एक आदर्श माता आहे. तिच्या शिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. तिचे प्रेम, मार्गदर्शन आणि काळजी च मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते. मी देवाला प्रार्थना करतो की माझी आई नेहमी आनंदी आणि निरोगी राहो आणि तिचे प्रेम माझ्यावर कायम राहो.
Majhi Aai Nibandh In 10 Lines
माझी आई खूप प्रेमळ आहे. ती आम्हां दोघांची म्हणजे माझी व माझ्या धाकट्या भावाची किती काळजी घेते! सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ती सर्वांसाठी, घरासाठी सतत धडपडत असते!
माझी आई दररोज सकाळी पाचला उठते; भराभर स्वयंपाक करते. आमचे शाळेत न्यायचे खाऊचे डबे तयार करते आणि मगच आम्हांला उठवते. आमची तयारी करायला आम्हांला ती मदत करते. आम्हांला न्याहरी करायला लावून शाळेत पाठवते. नंतर ती कामावर जाते.
संध्याकाळी घरी आल्यावर आई प्रथम घर नीटनेटके करते. मग स्वयंपाकाला सुरुवात करते. स्वयंपाक करता करता ती आमचा अभ्यास घेते. आम्ही अभ्यास केला नाही, तर तिला खूप राग येतो. कधी कधी ती मारही देते. आमचे वाढदिवस ती दणक्यात साजरे करते. सगळे सणवार ती आनंदात साजरे करते. ती स्वत: आनंदी राहते आणि आम्हां सर्वांना आनंद देते. अशी ही माझी आई मला खूप खूप आवडते.
आईचे स्थान आपल्या जीवनात सर्वात उंच आहे. तिची ममता, प्रेम आणि त्याग यांची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नाही. आई प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्या सोबत उभी राहते आणि आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते. तिच्या शिवाय जीवना शक्य नाही. मी आशा करतो की तुम्हाला माझी आई निबंध/Majhi Aai Nibandh Marathi आवडला असेल
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
माझी आई मराठी निबंध
My Mother Essay in Marathi
माझी आई मराठी निबंध (My Mother Essay in Marathi)
माझी आई निबंध मराठी 300 शब्द.
जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे.
माझ्या आईच नाव “वंदना केशव राव” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.
मला लक्षात आहे जेव्हा मि लहान होतो म्हणजे मि शाळेत जायला सुरवातच केली होती, पण तुमच्या प्रमाणे मला ही शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मि घरी शाळेत नाय जायचा हट्ट करायचा आणी शाळेत न जाण्यासाठी रडायचा. मि रडायला लागला कि माझे बाबा मला ओरडायला सुरवात करायचे आणि आई येऊन मला समजवत असे कि बाला असे शाळेत जायला रडू नये, आणि तिच्या मायेने मि शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायला व घ्यायला येत असे.
आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.
शाळेचा अभ्यास असेल किंव्हा आयुष्यामदे काही अडचण असेल तर सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्यांना बर नसेल तर रात्रभर जागून आपली देखबाल करणारी आईच असते. स्वताचा घास न खाता आपल्या मुलांना देणारी वेक्ती म्हणजे आईच असते.
आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्करणमदे आपल्या आईचा मोठा वाटा असतो. आई नेहमी आपल्या मुलांनवर आयुषभर चंगले संस्कार करते. आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.
माझ्या साठी माझी आईच माझ सगळ काही आहे, तीच माझा देव आहे. संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आईवर. तिची माझ्या वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणार पहिला शब्द म्हणजे “आईग”. मला मझी आई खूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.
माझी आई निबंध (350 Words)
आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य कमी पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही.” माझी आईही अगदी अशीच आहे.
आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्यास पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.
मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, ‘न ऋण जन्मदेचे फिटे.’ माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या ‘करीअर’चा कधीच विचार केला नाही.
ती स्वतः एम्. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती. माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.
खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.’
आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, ‘एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.’ आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई.” खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थांबतील. आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईची माया मिळाली नसेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’
Majhi Aai Nibandh (400 Words)
जीवनातील सर्व पदव्यांनी गुच्छ होऊन स्वागताला जावे, इतकी ‘आई’ ही पदवी सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले जाते. आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा झराच! साऱ्या दैवतांत ‘आई’ हे दैवत थोर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत ‘आई’ ही दोन अक्षरे कोरलेली असतात. आईचे प्रेम, तिच्या हळुवार स्मृती आपण सर्वजणच जपत असतो. बालपणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी आई म्हणजे आपला पहिला गुरू! साने गुरुजी नेहमी म्हणत, “आई माझा गुरू, आई कल्पतरू!” आई म्हणजे ममतेच्या महन्मंगल नदीवर गजबजलेलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे असे म्हणतात, ते योग्यच आहे.
आई आपल्या मुलांसाठी काय करत नाही? स्वतः तप्त उन्हाचे चटके सहन करते, पण मुलांना मात्र मायेची सावली देते; आपली मुले चांगली व्हावीत म्हणून ती त्यांच्यावर शिक्षणाचे, सद्गुणांचे चांगले संस्कार करते. त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. डोळ्यात तेल घालून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेते. स्वत:ची हौसमौज बाजूला सारून ती आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करत असते. मुलांचे काही चुकले तर ती रागावते, वेळीप्रसंगी कठोरही बनते; परंतु आईच्या रागामागे वात्सल्याचे सागरच दडलेले असतात. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठे व्हावे एवढीच तिची माफक अपेक्षा असते. त्यामुळेच एका क्षणी मुलांना रागावणारी, मारणारी आई दुसऱ्याच क्षणी त्यांना प्रेमाने जवळ घेते. म्हणूनच थोर कवी मोरोपंत म्हणतात,
“प्रसादपट झाकती परि परा गुरूंचे थिटे म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे।”
‘आई थोर तुझे उपकार’ या गाण्यात म्हटल्याप्रमाणे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. आईच्या मायेला अंत नसतो. ती मोठ्या मायेने आपल्या बाळाचे संगोपन करीत असते.
माझी आईही माझ्यासाठी खूप काही करत असते. अगदी लहानपणी मला बोटाला धरून ‘चाल चाल राणी’ करून पहिली पावले टाकायला तिनेच मला शिकवले होते. माझ्या सर्व लहरी सांभाळून मुळीच न कंटाळता ‘हा घास काऊचा, हा घास चिऊचा’ असे म्हणून तिनेच मला मऊ मऊ भाताचे घास भरवले होते.
आता मी शाळेत जाऊ लागल्यावर माझी शाळेची सर्व तयारी तीच करून देते. माझे छोटेसे दप्तर, त्यात पोळी भाजीचा छोटासा डबा सांभाळत आईचे बोट धरूनच मी रोज शाळेत जाते. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आईच्या हातचे काहीतरी गरम गरम खाऊन खेळायला पळायचे हा माझा रोजचा दिनक्रम. खेळून आल्यावर हातपाय धुऊन परवचा म्हणायची सवय आईनचे मला लावली आहे.
माझी आई मला अभ्यासातही मदत करते. मी परीक्षेत चांगले गुण मिळवले की ती मला शाबासकी देते. माझ्या आईला अव्यवस्थितपणा, गबाळेपणा मात्र बिलकुल खपत नाही. आईच्या रोजच्या सांगण्याशिकवण्यामुळेच मलाही आता व्यवस्थितपणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे मी आईच्या मनासारखे वागण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष पुरवणारी माझी आई म्हणजे माझे सर्वस्व आहे.
- दिवाळी मराठी निबंध
- आत्मनिर्भर भारत मराठी निबंध
माझी आई निबंध मराठी (450 Words)
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!” असे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. ते काही विनाकारण नाही. आई आपल्यासाठी दिवसभरातून पूर्णपणे कितीतरी कामे करत असते. तिचे निस्सीम प्रेम आणि समर्पण कुटुंबातल्या सर्वांप्रती असते. आईचे प्रेम हे शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही.
माझी आई कुटुंबातल्या सर्वांची खूप काळजी घेते. आमचे कुटुंब एकत्र कुटुंब आहे. कुटुंबात एकूण दहा लोक आहेत. माझ्या आईचे नाव सुमल आहे. आई आणि बाबांचे लग्न झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे ते दुसऱ्या गावी राहत होते. माझे बाबा कामानिमित्त बाहेरगावी असायचे. मला एक मोठा भाऊ आहे.
मला जसे आठवते तेव्हापासून मीच माझ्या आईचा लाडका आहे. मी लहान असताना मला दररोज खाऊ द्यायची. तिने खाण्यापिण्यात आमची कधीही हयगय केली नाही. बाबा रोज सकाळी कामाला जात असत. त्यामुळे तिची उठण्याची वेळ म्हणजे सकाळी ६ वाजता असते. आमची शाळा १० वाजता भरते. बाबांचा आणि आमचा डबा ती सकाळी उठल्या उठल्या बनवते.
बाबा कामाला गेल्यानंतर ती सकाळी ७ वाजता आम्हाला उठवते. सकाळी उठून दात घासणे, शौचाला जाणे, अंघोळ करणे अशा सवयी तिने आम्हाला लावल्या आहेत. अंघोळ झाल्यानंतर आम्ही एकत्र देवाची प्रार्थना म्हणतो. ती प्रत्येकवर्षी एक नवीन प्रार्थना आम्हाला शिकवते. ती प्रार्थना वर्षभर म्हणावी लागते. रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आत्तापर्यंत शिकवलेल्या सगळ्या प्रार्थना म्हणाव्या लागतात.
शाळेत जाताना आम्हाला ती तयार करते. पाण्याची बाटली आणि डबा भरून देते. बाहेरचे पाणी पिण्यास आम्हाला सक्त मनाई आहे. अजून मला बूट घालता येत नाही. मला बूटसुद्धा तीच घालते. आम्ही शाळेत गेल्यानंतर आजी आजोबांचे जेवण बनवणे, घराची साफसफाई ती करते. माझी काकी आणि आई दोघी मिळून मग घरातील उरलेली सर्व कामे पूर्ण करतात.
माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. तिचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. गोष्टीची आणि अध्यात्मिक पुस्तके ती वाचत असते. त्यामुळे आम्हाला देखील वाचनाची आवड निर्माण झाली. शाळेतून आल्यानंतर ती आम्हाला हातपाय धुवायला लावते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही खेळत असतो. तोपर्यंत बाबा कामावरून आलेले असतात.
७ ते ८ वाजेपर्यंत अभ्यास करणे हा घरात नियम आहे. आई आणि काकी आता एकत्र रात्रीचा स्वयंपाक करतात. आम्ही चुलत आणि सख्खे असे मिळून ४ भावंडे आहोत. आम्हाला रात्री साडे आठ वाजता एकत्र जेवण करावे लागते. जेवण झाल्यानंतर आई झोपताना रोज एक गोष्ट सांगते. गोष्टीचे तात्पर्य ऐकून आम्ही झोपून जातो.
आई खूपच सोज्वळ स्वरूपाची आहे. तिचा साधेपणा सर्वांनाच आवडतो. साधे राहावे आणि शांत जगावे अशी तिची शिकवण नेहमी असते. शिवणकाम आणि वाचन असे तिचे छंद आहेत. बाबांसोबत ती कधीच वाद घालत नाही. टीव्हीमुळे मुले बिघडत आहेत अशी तिची समज आहे. त्यामुळे आम्हाला जास्त टीव्ही पाहू दिला जात नाही याउलट खेळ आणि वाचन मात्र भरपूर प्रमाणात करवले जाते.
आठवड्यातून एकदा तरी आई आम्हाला बाहेर फिरायला नेते. मंदिरात, बागेत किंवा रानात फिरायला जाणे तिथे जेवण करणे असा क्रम ठरलेला असतो. सुट्टीच्या दिवसात आम्ही आईसोबत कॅरम खेळतो. उन्हाळ्याचे दिवस आम्हाला खूप आवडतात. आम्ही मामाच्या गावाला फिरायला जातो तसेच खूप मौजमजा करतो. आई वर्षातून दोनदा तरी माहेरी जात असते.
आई सर्वकाही प्रेमातून करत असते. ती कधीकधी माझ्याकडून चुकी झाल्यावर रागावते आणि नंतर कुशीत घेऊन समजावून सांगते. तिचे समजावणे मला खूप आवडते. माझी आई खूप आनंदी आणि हसतमुख आहे. तिची प्रतिभा आणि तिचे संस्कार मला आयुष्यभर पुरतील असेच आहेत.
essay on mother in marathi (500 Words)
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जर महत्वाचं व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे – आई. आई हा शब्द अत्यंत सोपा आहे परंतु त्या शब्दामागे अपरंपार माया दडलेली आहे. एक संपूर्ण जगच यामध्ये सामावलेल आहे.
आपल्याला जन्म देऊन जगात आणणारी आई ईश्वराचं रूप आहे. ईश्वराने आईला यासाठी बनवलं आहे कि, ईश्वर हा प्रत्येक मुलाजवळ नाही राहू शकत. म्हणून आईला ईश्वराचं दुसरं रूप समजलं जात.
आई म्हणजे वात्सल्याचा वाहणारा झरा आहे. तसेच आई म्हणजे – ममता, आत्मा आणि ईश्वराचा संगम आहे. तसेच मायेची पाखरं करणारी स्त्री म्हणजे आई होय.
आई हा एक शब्द नव्हे तर ती एक भावना आहे. म्हणून म्हटले आहे कि, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. तसेच साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरू.
त्याच प्रमाणे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे – माझी आई होय. माझ्या आईचे नाव वंदना असे आहे. तिचे वय ४० वर्ष आहे. मी माझ्या आईची प्रशंसा आणि आदर करतो. माझी आई हि माझ्या आयुष्यातील सर्वात पहिला गुरु आहे.
माझी आई माझी काळजी घेते आणि माझ्यासाठी सर्व काही अर्पण करते. माझी आई मला सकाळी लवकर उठवते आणि आमच्या उठण्या पूर्वीच तिच्या नेहमीच्या कामांची सुरुवात होते. माझी आई आमच्या सर्वांसाठी गोड खाद्य बनवते.
जरी माझी आई कामात व्यस्त असली तरी माझ्यासाठी थोडासा वेळ काढते आणि माझ्या बरोबर खेळायला मदत सुद्धा करते. तसेच माझी आई मला गृहपाठ करण्यास मदत सुद्धा करते. माझी आई अन्य उपक्रमांमध्ये मला मार्गदर्शन करते.
कष्टाळू व मेहनती
माझी आई खूप कष्टाळू आणि मेहनती आहे. ती सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काम करत असते. माझी आई नेहमी दुसऱ्यांसाठीच झटत असते.
तिच्या चेहरा नेहमी हसत असतो. म्हणून मी तिच्या कडूनच शिकलो कि, कठीण परिश्रम हि आपल्याला यशस्वी बनवतो. आमच्या घरामध्ये जर कोणाला बर नसेल तर माझी आई रात्रभर त्याची काळजी घेते.
माझी आई ही माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्यासाठी देव सुद्धा आहे. माझ्या आईने लहानपणापासून मला चांगले संस्कार देऊन मला घडवले आहे. जर मला काही लागलं तर ओठावर येणार पहिला शब्द म्हणजेच – आई.
तसेच संकटाच्या वेळी साथ देणारी आणि दुःख सोसून सुखात ठेवणारी आई असते. माझी आई हि माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण ती आपल्या सोबत राहून किती जबाबदारी पार पडत असते.
माझी आई जर का आजारी पडली तर आम्हा सर्वाना संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं. तेव्हा असं वाटतच नाही कि, हे आपलं घर आहे. माझी आई नेहमी जी कामे करते ती कामे इतर कोणालाही करून संपत नाही
आई मायेचा सागर
आई हि मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील प्रभू श्रीरामचंद्रांनी स्वर्णमयी लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षा आपली अयोध्या या जन्म भूमीला सर्वश्रेष्ठ मानले आहे.
हे सांगताना त्यांनी आपल्या जन्मभूमीची बरोबरी आईशी केली आहे. मराठीमध्ये प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेमध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी हि ओळ लिहून आईची महानता वर्णविली आहे.
माझी आई हि एक व्यक्ती नसून आमच्या जीवनाचा आधार स्तंभ आहे. या जगामध्ये आईची तुलना हि कोणाशी करता येणार नाही आणि तिची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही.
म्हणून माझी आई मला खूप प्रिय आहे आणि ती मला खूप – खूप आवडते. मी माझ्या आईवर खूप करतो आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो.
Marathi Essay on My Mother (700 Words)
आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये. जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे. लहानपणापासून आंजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते. आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टर आणि नर्स दोन्ही होते. रात्र रात्रभर जागून आपली सेवा करते. कधी माया करते, कधी रागावते परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्याच भल्याचा विचार करते.
माझी आई सुद्धा अशीच सामन्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणापासून बघितले तिला दिवस-रात्र घरात कष्ट करताना. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच समोर गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो.
मग सुरु होते आईची धावपळ – आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठे आहेत, डबा भरला का? मला नाही आवडत हि भाजी, बेसनची पोळी दे काढून. किती किती ऑर्डर्स एका पाठोपाठ एक. पण कधीही त्रागा न करता आई सर्व फर्माईशी पूर्ण करत असते. या मध्ये बाबांचे आणि आजीचे आदेश तर वेगळे असतातच. कुठून आणते आई एवढा सगळा उत्साह आणि शक्ती देव जाणे. मला तर सकाळी उठून शाळेत जायचे म्हटले तरी जीवावर येते. आभ्यास करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वाटते.
एकदा आईला म्हटले सुद्धा, तुझ आयुष्य किती छान आहे, ना अभ्यासाची कटकट ना परिक्षेच टेन्शन ना रिझल्टची भीती. आई हसून बोलली तुला कोणी सांगिलत कि मला अभ्यास नसतो, दररोज सर्वांच्या आवडी निवडी प्रमाणे जेवण-नाश्ता बनविणे, तुमची सांगितलेली कामे लक्षात ठेवून करणे हे काही गृहपाठापेक्षा कमी आहे का? आणि परिक्षेच बोलाल तर माझी तर रोजच परीक्षा असते. आणि रोजच माझा रिझल्ट लागतो. माझा प्रश्नांकित चेहरा बघून हसून बोलली – आज भाजी चांगली नाही झाली, मीठ कमी आहे आमटीत, चटणी छान झाली आहे… तुम्ही सर्वजण वेळ न दवडता माझ्या कामाचे प्रगती पुस्तक देऊन मोकळे होतात.
खरच किती खरी गोष्ट आहे ना, आपण आपल्या खास मित्र-मैत्रिणींना सुद्धा इतक्या सहजपणे सांगत नाही कि ते चुकले आहेत, किंवा त्यांचं वागण बरोबर नाही, किती सावधानतेने त्यांचं मन न दुखवता त्यांच्याशी बोलतो पण आई, आईच्या मनाचा कधीच इतका खोलवर विचार करत नाही. आपल्या वागण्या बोलण्याने ती दुखावेल असा विचारही मनात येत नाही. किती गृहीत धरून चालतो आपण आईला.
बाबांना राग येणार नाही याची काळजी घेतो, फ्रेंड्सना वाईट वाटणार नाही याचीहि काळजी घेतो. पण कधीही आईच्या मनाची काळजी करत नाही. कधी कधी तर इतरांचा रागही तिच्यावर काढतो पण ती एखाद्या संताप्रमाणे सारे काही सहन करते आणि वाट बघते तुमचा राग शांत होण्याची, आणि मग काहीही घडलं नसल्याप्रमाणे वागू लागते, अपेक्षा नाही करत की तुम्ही तुमची चूक कबूल कराल; तुमच्या माफी माग्ण्यापुर्वीच तुम्हाला माफ करून मोकळी झालेली असते.
माझी आई आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे याची मला कधी कल्पना हि नव्हती. किती सहजपणे आपली कर्तव्य पार पाडत आपली आवश्यकता बनून जाते. मला हे तेव्हा समजले जेव्हा एकदा माझी आई आजारी पडली. आई सोबतच संपूर्ण घर आजारी पडल्या सारखे वाटत होते. आई तापामुळे आणि डोकेदुखी मुळे हैराण झाली होती. बाबांनी तिला आराम करायला सांगितले आणि घराची जबाबदारी स्वतः उचलली.
त्या दिवशी ना नाश्ता वेळेवर मिळाला ना जेवण. चवीचं तर विचारूच नका. घर आवरलं नसल्यामुळे अस्त्यावस्त पडले होते. किचनच्या सिंक मध्ये भांड्यांचा ढीग पडला होता. तीच स्थिती बाथरूमची सुद्धा झाली होती. असं वाटतच नव्हत की हे आपलं घर आहे. खूप प्रयत्न केला मी आणि बाबांनी सर्व आवरण्याचा पण कुठून सुरवात करावी आणि काय काय कराव हेच कळत नव्हत.
माझी आई रोज एवढी काम करते की जी मला आणि बाबांना सुद्धा संपत नव्हती, आणि ती सुद्धा हसतमुखाने. त्यादिवशी पासून माझ्या आणि बाबांच्या मनात आई बद्दल आदर आणि प्रेम दुप्पटीने वाढले. मी तर मनापासून ठरवलं की आजपासून आईला जास्त काम सांगायची नाहीत. जेवढी जमतील तेवढी काम स्वतःच करायची. तिला तिच्या कामात सुद्धा शक्य तेवढी मदत करायची.
आईला जेव्हा संध्याकाळी थोड बर वाटलं तेव्हा उठली आणि लगेचच कामाला लागली. मी आणि बाबा होतोच मदतीला. तेव्हापासून आजपर्यंत कधीही आईला विचारल नाही कि तू दिवसभर घरी काय करत असतेस? कारण आईने न सांगताच आम्हाला कळाल की आई फक्त एक माणूसच नाही तर ती आमच्या घराचा आत्मा आहे, कणा आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे का म्हणतात हे आता मला खऱ्या अर्थाने उमगले.
शेवटचा शब्द
तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आई बद्दल काय वाटते आणि तुम्हाला तुमच्या आईवर किती प्रेम आहे, आम्हाला खाली comment करून कळवा
स्वामी विवेकानंद मराठी निबंध
डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध
मेरी माँ पर हिंदी निबंध
दादी माँ पर हिंदी निबंध
Comments (7)
ह्यांनी मला खूप मदद झाली। धन्यवाद!
आई बाबा माझे सर्वकाही आहे.
खूप छान निबंध आहे
My Mom Dad is my life
Very nice???
Leave a Comment जवाब रद्द करें
Majha Nibandh
Educational Blog
माझी आई निबंध काळजाला स्पर्श करणारा Mazi Aai Nibandh in Marathi
Mazi aai nibandh in Marathi, Essay on Mother in Marathi for class 1,2,3,4,5,6,7,8,9,10.
माझी आई माझ्यासाठी माझा स्वर्ग आहे. माझी आई मला शाळेला जाताना सकाळी सकाळी लवकर उठवते आणि मला आंघोळ घालते. माझी आई मला डबा करून डबा स्कूल बॅग मध्ये ठेऊन मला शाळेला पाठवते माझी आई खूप काबाडकष्ट करून मला ती शाळा शिकवते.
आई वडिलांपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते. आई ही एक आई नसून ती माझ्यासाठी स्वर्ग आहे. मी माझ्या आईला देव मानतो आई एक पृथ्वी आहे. आई माझी घरातील सगळे कामे करते. आणि आई आमच्या सर्व कुटुंबावर खूप खूप प्रेम करते.
आई मला शाळेत जाताना खाऊसाठी पैसे देते. माझी आई मी वडील बहीण असे माझे छोटेसे कुटुंब आहे. त्या कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी आई माझी आई शाळेत येऊन माझी चौकशी करते आई माझा अभ्यास घेते. आई घरातील सर्व कामे करते. आई आमच्या घरच्या गाईच्या गोठ्यातील सर्व कामे सकाळी करून घेते.
ती सकाळी खूप लवकर उठते. माझी मला चांगल्या सवयची आठवण करून देते. माझी आई 15 ऑगस्ट, 26 जानेवारी दिवशी मला सकाळी पहाटे उठवून आंघोळ करण्यासाठी गरम पानी करून ठेवते. माझी आई माझा रोज अभ्यास करून घेते. माझी आई सर्व गुण संपन्न आहे.
माझी आई आमच्या घरातील सर्व पाहते. आजी, आजोबा, यांची देखभाल करते. त्यांना बागेत फिरवयास घेऊन जाणे अशी सर्व कामे करते. घरातील सर्व लोकांना हव नको ते पाहते. आजी आजोबा यांची देखभाल करते त्यांना गोळ्या औषधे वेळेवर नेऊन देते. त्यांना जेवण वेळेवर देते अशी सर्व कामे माझी आई नित्य नियमाने करते. माझी आई सणादिवशी सर्व घर साफ करते.
सणादिवशी गोड स्वयपाक जसे पुरण पोळी, गुलाबजाम, भाजी, भात, बनवते. माझी आई स्वयंपाक स्वादिष्ट बनवते. आई हे होटांवर येणारे पहिले हास्य आहे. आई अश्रु आनंद आहे. माझी आई माझ्यासाठी जग आहे.
Mazi Aai Nibandh in Marathi
माझ्या आईवर माझे खूप प्रेम आहे. माझी आई जगासाठी कशी पण असो पण माझी आई माझ्यासाठी माझी इच्छा माझे स्वप्न ही सगळे फक्त माझी आईच आहे. या जगात आपल्या जवळ कितीही पैसा असला तरी आपल्या आईशिवाय आपल या जगात दुसर कोणीच नसत. आई हीच खरी आपली संपती आहे. आई हेच खर आपल दैवत आहे. या जगात आईची बरोबरी कोणीच करू शकत नाही.
ज्याच्याजवळ आई आहे तो या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति आहे. म्हणतात ना स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी हे अगदी खर आहे. तुम्ही या सर्व जगाचा मालक बनू शकता पण तुमच्याजवळ आई नसेल तर तुम्ही सर्व काही असून सुद्धा भिकारी असल्यासारख आहे. त्यासाठी आपण जिंवतपनी आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे. तिच्या म्हातारपणी तिला आधार दिला पाहिजे तिला हव नको ते पाहिलं पाहिजे.
हॅलो माझी आई घरातील सर्व कामे वेळेवर करून तिचा छंद जोपासते, जसे घरासमोर रांगोळी काढणे, रोज सकाळी देवाची पूजा आरती करणे, घरासमोरील तुळशीला पाणी घालने, तुळशीला हळद-कुंकू वाहने, अगरबत्ती लावणे, घरामध्ये रिकाम्या वेळेत विणकाम करणे, अशी कामे माझी आई न चुकता करते.
माझी आई माझ्यासाठी माझ्या आवडीचा पदार्थ खाण्यास बनवते, प्रत्येक वर्षी माझी आई माझ्यासाठी नवीन कपडे खरेदी करते, माझ्या वाढदिवसा दिवशी माझी आई माझ्या आवडीची खीर बनवते व मला पंचारती घेऊन ओवाळते आणि मला माझ्या भावी जीवनाच्या शुभेच्छा देते.
माझी आई माझ्यासाठी या जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे. माझी आई माझ्या घरातील सर्व लहान-थोर व्यक्तींची काळजी घेते. माझी आई गोठ्यातील जनावरांना चारा देणे, पाणी देणे त्यांची निगा राखणे इत्यादी कामे खूप कष्टाने पार पडते. माझी आई अतिशय कष्टाळू आहे माझी आई मला न चुकता अभ्यासाची आठवण करून देते.
खरच मित्रांनो या जगात आई एवढं आपल्यावर प्रेम करणारं कोणीच नाही इतिहासामध्ये सुद्धा आईचं महात्म्य सांगितल आहे. आई खरंच खूप गुणी आणि कष्टाळू असते तिच्या एवढं आपल्यावर कोणी प्रेम करू शकत नाही. तुम्ही या जगामध्ये पैशाने सर्व काही विकत घेऊ शकता, पण आईचे प्रेम तुम्हाला या जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाही.
आई म्हणजे जीवन आई, आई म्हणजे श्वास आहे, आई म्हणजे ध्यास आहे, आई म्हणजे दैवत आहे. आई म्हणजे सर्वस्व आहे.
सूचना: जर तुम्हाला Mazi aai nibandh in Marathi, Essay on Mother in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेयर करा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.